सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) सन २०२२, २०२३,२०२४

अतिमहत्वाचे - पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) २०२२, २०२३ व २०२४ मधील शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खाते माहिती भरणे बाबत परिपत्रक दिनांक 25-10-2024






उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) सन २०२२, २०२३ व २०२४ मध्ये शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याच्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२४ च्या लॉगीनमध्ये 'FILL BANK DETAILS' या मथळ्याखाली एकत्रितरीत्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन भरणेसाठी लॉगीनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी बँक खात्याची माहिती न भरलेल्या सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तर/तालुकास्तरावर तात्काळ कॅम्पचे आयोजन करून आपल्या स्तरावरून माहिती भरण्याबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये सूचित करण्यात आले होते.


तरी दिनांक १६/११/२०२४ रोजी संकेतस्थळावर सदरची सुविधा बंद करण्यात येणार आहे. तरी सदर बाबींचे गांभीर्य लक्षात घेता सन २०२२, २०२३ व २०२४ मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती शाळेच्या लॉगिन मधून भरण्यासाठी तात्काळ सर्व संबंधित शाळांना आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे. सदरची मुदत अंतिम स्वरूपाची असल्याने विद्यार्थ्यांची माहिती दिलेल्या मुदतीत भरण्याची दक्षता घ्यावी.


सदरच्या अंतिम मुदतीच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या बैंक खाते माहिती प्राप्त न झाल्यास विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास व त्याबाबत विधीमंडळ तारांकित / अताराकिंत प्रश्न, लोकआयुक्त प्रकरण, माहिती अधिकार या प्रकारचे प्रश्न निर्माण झाल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची गांर्भीयाने नोंद घेण्यात यावी. तरी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बैंक खात्याची माहिती त्वरित भरण्याच्या अनुषंगाने योग्य ती दक्षता घेण्यात यावी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

11वी प्रवेश प्रक्रिया 2024-25: संपूर्ण मार्गदर्शन व सुधारित वेळापत्रक

  11वी प्रवेश प्रक्रिया 2024-25: संपूर्ण मार्गदर्शन व सुधारित वेळापत्रक विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, 10वीच्या यशस्वी वाटचालीनंतर आता 11वी प...